April 23, 2026 2:15 pm

*व्हॅलेंटाइन डेला प्रेमीयुगुल कारमध्ये मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ,

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नोएडात व्हॅलेंटाइन डे दिवशीच नोएडात तरुण तरुणीचे मृतदेह कारमध्ये आढळल्यानं खळबळ उडालीय. दोघांनाही गोळी लागल्याचं समोर आलंय. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.गाडीत दोघांचे मृतदेह होते. तरुणाच्या हातात पिस्तुल होती. त्यामुळे तरुणाने आधी तरुणीला गोळी मारली असावी आणि नंतर स्वत:वर झाडून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नोएडाच्या सेक्टर ३९ मध्ये शनिवारी दुपारी एक कार संशयास्पदरित्या रस्त्याच्या कडेला आढळून आली. स्थानिकांनी जेव्हा कारमध्ये डोकावलं तेव्हा तरुण आणि तरुणीचा मृतदेह असल्याचं समजलं. यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गाडीचे दरवाजे उघडल्यानंतर पाहिलं असता मृत तरुणाच्या हातात पिस्तुल होतं तर तरुणीही मृतावस्थेत होती. दोघांचाही गोळी लागून मृत्यू झाला होता.

पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आधी तिला गोळी मारली असावी. त्यानंतर स्वत: गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोघांकडेही मिळालेल्या आयडी कार्डवरून त्यांची ओळख पटली आहे. तरुण दिल्लीतल्या त्रिलोकपुरीचा आहे. तर तरुणी नोएडा सेक्टर ५८ मध्ये राहत होती. तरुणाचं नाव सुमित असून तरुणीचं नाव रेखा असं आहे.

सुमित आणि रेखा शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. दोघांचे मृतदेह शनिवारी कारमध्ये आढळळ्यानंतर याची माहिती कुटुंबियांना देण्यात आलीय. शनिवारी दुपारी गोळी झाडली गेली, त्यावेळी एका डिलिव्हरी बॉयला आवाज ऐकू आला. त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!