April 19, 2026 11:30 pm

*19 वर्षीय तरुणींच्या दहशतीने मुलगा पोहोचला पोलिसांकडे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतल्या मानखुर्द परिसरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरूणीकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

‘एकतर्फी प्रेम’मधून तरूणीने अल्पवयीन मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहे. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत त्या तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सुरू होते. या विचित्र घटनेमुळे मुंबई शहर हादरले आहे. अल्पवयीन मुलाने कुटुंबाला सांगण्याचे धाडस केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घडलेल्या प्रकरणी कुटुंबाकडून तात्काळ मुंबई पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी तरूणीने अल्पवयीन मुलावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता आणि त्यानंतर त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता. पण त्याने लग्नाचा प्रस्ताव अपहरण नाकारल्यामुळे त्या तरूणीने त्याचं अपहरण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. या घटनेविषयीची माहिती ‘लोकमत टाइम्स’ ने दिली आहे. पोलिसांना विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरूणीचे अल्पवयीन मुलावर एकतर्फी प्रेम होते. ऑगस्ट 2025 पासून त्या तरूणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार सुरू होते. सर्वात पहिल्यांदा तरूणी आरोपीने अल्पवयीन मुलासोबत खोटं बोलून तिच्या घरी नेलं. ती तरूणी इतक्यावरच थांबली नाही. घरी नेऊन त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले.

अल्पवयीन मुलगा तरूणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार देत होता. पण तिने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. जर का तू कोणाला याबद्दल काही सांगितलंस, तर याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकीही तिने त्याला दिली. तब्बल 7 महिने त्या तरूणीकडून अल्पवयीन मुलाचा वारंवार छळ सुरू होता. शिवाय तिने त्याच्यावर लग्न करण्यासाठीही दबाव टाकत होती, जर का त्याने लग्नाला नकार दिला तर ती तिच्या जीवाचं बरं- वाईट करेल, अशी धमकी सुद्धा तिने त्याला दिली होती. त्या तरूणीने अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं होतं. पण तो तिच्या तावडीतून कसा बसा सुटला आणि घर गाठलं. घडलेले संपूर्ण प्रकरण अल्पवयीन मुलाने त्याच्या कुटुंबीयांना सांगितले.

अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी मानखुर्द पोलीस स्थानक गाठून पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. लगेचच त्यांनी तक्रारही दाखल करून घेतली. जरीही अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी तरूणीविरोधात तक्रार दाखल केली असली तरीही तरूणीला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. फरार आरोपी तरूणीचा मानखुर्द पोलिसांकडून शोध सुरू असून घटनेची सखोल चौकशी करीत आहेत. घटनेविषयी एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “पीडित मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही 19 वर्षीय तरूणीविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरणाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे.”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!