April 23, 2026 3:33 pm

*नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुरगूड (वा.) सह्याद्री घाटाला खेटून असलेल्या, राधानगरी अभयारण्य व पर्जन्यछायेच्या भागातील सावर्डे बुदुक गावात गवा थेट नागरी वस्तीत शिरून एका घरात घुसल्याची घटना घडली.

अचानक समोर आलेल्या या रानटी आण्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दुर्दैवाने या गव्याला ताप होता आजारामुळे त्याचा मृत्यू झाला. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या हिवाळी महिन्यांत सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढण्याची प्रवृत्ती आढळते.पर्जन्यछायेच्या प्रदेशात या काळात नैसर्गिक कुरणांतील हिरवळ कमी होत जाते. शेतातील पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले कणस, भाजीपाला किंवा पाण्याचे स्रोत यामुळे प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने आकर्षित होतात.

नवी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले

दरम्यान, दौलतवाडी येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने एका महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, सावर्डे खुर्द येथे वन्यप्राण्याने थेट घरात प्रवेश केल्याची नवी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सह्याद्री घाटाला लागून असलेल्या या भागात हिवाळ्यात वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढत असल्याचे चित्र असून, अन्न व पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, वन विभागाने सतर्कता वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

जंगली प्राण्यांच्या वर्तनात बदल

गवा हा मोठा शाकाहारी वन्यप्राणी असून तो सामान्यतः जंगल, डोंगर उतार आणि मोकळ्या कुरणांमध्ये कळपाने वावरतो. मात्र अन्न व पाण्याच्या शोधात तो नवीन परिसर तपासतो, थंडीच्या दिवसांत तापमानातील बदलामुळे त्यांची हालचाल सकाळ संध्याकाळ वाढते. सुरक्षिततेच्या दृष्टीने शांत भाग शोधताना ते चुकून नागरी वस्तीत प्रवेश करतात.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

वन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अशा वेळी प्राण्याला घाबरविण्याचा किवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये. त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, घराबाहेर कचरा, धान्य किंवा पिकांचे अवशेष साठवू नयेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे. वन्यजीव मानव संघर्षाच्या ब्धटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!