April 23, 2026 4:39 pm

*शिरूर तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शिरूर तालुक्यातील मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी उशिरा रात्री धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास नितीन उर्फ देवा सुरज चव्हाण (वय २६, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) व गणेश तानाजी सांळुखे (वय १९, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी संतोष बाळासो पवार (वय २४, rा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर कोणत्यातरी कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संतोष पवार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत संतोष पवार यांच्या पत्नी साधना संतोष पवार (वय २१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी आरोपींकडे कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करडे व सरदवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!