April 17, 2026 4:32 pm

*’हात काय, आम्ही मिठी मारायला तयार.’, शिवेंद्रसिंहराजेंचे पालकमंत्र्यांबाबत सूचक विधान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘हात काय, आम्ही मिठी मारायला तयार.’, शिवेंद्रसिंहराजेंचे पालकमंत्र्यांबाबत सूचक विधान

पालकमंत्री म्हणाले आम्ही हात पुढे केला तर तो तुम्ही घेतला नाही अहो हातच काय आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत अशी मिश्किल राजकीय कोटी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी करत जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या विषयावर सूचक भाष्य केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हास्यविनोद’ अन् राजकीय चर्चा

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीसाठी एकत्र आले होते. या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विरोधात लढलेल्या दोन मुख्य पक्षांची निवडणूक प्रमुख एकत्र हास्यविनोद करताना दिसल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.

शिवेंद्रसिंहराजेंचे सूचक वक्तव्य

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजातच प्रसारमाध्यमांनी दोन्ही मंत्र्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः शिवेंद्रसिंह राजे यांना प्रसार माध्यमांनी जिल्हा परिषदेच्या सत्ते संदर्भातील प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले पालकमंत्र्यांनी पुढे केलेला हातच काय आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत त्यांची तयारी आहे का असे सूचक वक्तव्य केले.

सत्ता स्थापनेचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात?

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर शिवेंद्रसिंह राजे म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही स्थानिक नेते म्हणून कायम एकत्र आहोत आणि जिल्हा परिषदेचे पुढचे पुढे बघू असे म्हणत शिवेंद्रसिंह राजे यांनी एका वाक्यात विषय संपवला. शंभूराज देसाई हे मोठे आहेत त्यांनी मला बैठकीला कधी थेट पणे बोलवले आणि मी आलो नाही असे कधीही घडले नाही. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी हस्ते पर हस्ते निरोप आल्याने जरा घोटाळा झाला. जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भाजपप संख्येने मोठा आहे पण शंभूराज देसाई हे सुद्धा मोठे आहेत तेव्हा ते ठरवतील त्यावेळी बघू असे शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले.

दोन वेळा बैठक बोलावून आम्ही तोंडावर पडलो असे वक्तव्य पालकमंत्री देसाई यांनी केले होते या प्रश्नावरही बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले असे काही नाही तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे . सत्ता स्थापनेच्या चर्चे संदर्भात शंभूराज देसाई यांनी सांगावे अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली .

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!