April 23, 2026 5:20 pm

*आंबेगावमध्ये ऊस तोडणीदरम्यान सापडली बिबट्याची तीन पिल्ले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

येथील कैलास बबन वाघ या शेतकऱ्याच्या शेतात ऊसाची तोडणी सुरू असताना ऊस तोडणी मजुरांना १० ते १५ दिवसाची डोळे न उघडलेली बिबट्याची तीन पिल्ले बुधवार (ता.११) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सापडली.

आंबेगाव तालुक्यातील रांजणी कैलास बबन वाघ यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू असताना सकाळी नऊ वाजता ऊस तोड कामगार ऊस तोडणी साठी आले असता बिबट्याची तीन पिल्ले ऊस तोडे कामगारांना दिसली,ऊस तोडणी कामगारांनी ऊस उत्पादक शेतकरी कैलास वाघ यांना शेतात बिबट्याची पिल्ले सापडल्याचे सांगितले.त्यानंतर भीतीपोटी ऊस तोडी कामगारांनी ऊस तोडण्याचे थांबवले.ग्रामस्थांनी बिबट्याची पिल्ले सापडल्याची माहिती मंचर येथील वनविभागाला दिली.

मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी,शीघ्र कृती दल व रेक्सू टीम मेंबर घटनास्थळी दाखल झाले.सापडलेल्या तीन बिबट्याच्या पिल्लांचा नुकताच जन्म झालेला असून ही पिल्ले दहा ते पंधरा दिवसाची असून डोळे न उघडलेल्या स्थितीत आहेत या पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून पिल्ले ज्या ठिकाणी सापडले आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. बिबट्याची मादी आक्रमक होऊ नये म्हणून ही पिल्ले आईच्या कुशीत देण्यात येणार आहेत.वन विभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले असून वनविभागाची बिबट मादीच्या हालचालीवर नजर राहणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!