April 23, 2026 3:56 pm

*राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत 

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अभिनेता श्रेयस तळपदे बद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मणिपूर जिल्ह्यात श्रेयस तळपदे आणि इतर १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या सर्वांवर गुंतवणूकीशी संबंधित घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मंगळवारी भोगांव पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोहल्ला मिश्रान येथील एका रहिवाशाने अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, श्रेयस तळपदेने त्याच्या सहकाऱ्यांसह मोहल्ला मिश्रान येथील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणूक योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तथापि, या आरोपांबाबत श्रेयस तळपदेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. श्रेयस तळपदेबद्दल केवळ अभिनेताच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त, त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!