April 23, 2026 5:20 pm

*प्रेयसीला छेडण्याच्या वादातून तरुणावर हल्ला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रेयसीला छेडू नकोस, असा इशारा देत एका तरुणावर हाताबुक्क्यांनी व धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी फैजान रफीक शेख (वय २५, रा. राठोड लेआउट,गिट्टीखदान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युसुफ सलीम खान अन्सारी (वय २२) आणि अल्पवयीन आरोपीची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फैजान हा सोमवारी (ता.९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास संतोष उपाध्याय यांच्या पानठेल्यासमोर उभा असताना परिसरात राहणारा युसुफ सलीम खान अन्सारी याने त्यांना अडवले. त्याने ‘माझ्या गर्लफ्रेंडला छेडू नकोस,’र असे म्हणत त्याने फैजान याला हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन आरोपीनेही त्याच्यासह मारहाण करीत त्याला जखमी केली. यावेळी त्याच्या डोक्यावर तलवारीने करण्यात आल्याने फैजानला जखमी झाले. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जुगाराच्या वादातून हल्ला

पेन्शननगर परिसरात घरासमोर जुगार खेळण्यासाठी हटकल्याने युसुफ सलीम खान याने साथीदारासह ३८ वर्षीय इसमास मारहाण केली. याप्रकरणीही त्याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. माहितीनुसार, गिरीज नरेशसिंग राठोड (वय ३८, रा. पेंशननगर, रामाबाई वाडा, सिट्टी, नागपूर) हे ९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ड्युटीवरून घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घराजवळ युसुफ सलीम खान अन्सारी (वय २२, रा. मानकापूर), गोलू ऊर्फ नाम्या (वय १९, रा. पेंशननगर) आणि अल्पवयीन आरोपी हे तिघे बसून जुगार खेळत होते.

राठोड यांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यावरून तिघांनी राठोड यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मयूर मरकाम याने स्टीलच्या तलवारीने राठोड यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. आरडाओरड ऐकून नागरिक जमा झाल्याने आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!