April 21, 2026 11:03 pm

*अर्जुनच्या लग्नासाठी PM मोदीनांही आमंत्रण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचे सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न होणार आहे.

त्यांच्या लग्नाची आमंत्रणंही देण्यास सुरुवात झाली आहे.

नुकतेच सचिन तेंडुलकरने  सहकुटुंब जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी   आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊ त्यांना या लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

सानिया चंडोक  ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून तिचा अर्जुनसोबत  गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा पार पडला होता. आता हे दोघेही यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाबाबत बरीच चर्चा सुरू होती.

यातच आता सचिनने स्वत: सोशल मीडियावर मोदींना आमंत्रण दिल्याची पोस्ट शेअर केल्याने अर्जुन आणि सानिया लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

सचिनने पोस्ट केली आहे की ‘माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अर्जुन आणि सानियाच्या लग्नासाठी आमंत्रित करताना आनंद होत आहे. मोदीजी यांचे आभार की त्यांनी या युवा जोडप्याला आशीर्वाद दिले आणि त्यांना चांगला सल्ला दिला.’

सचिनने या पोस्टसोबत नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये सचिनसोबतच त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर, मुलगा अर्जुन आणि होणारी सून सानिया देखील दिसत आहेत.

याशिवाय सचिनने अमित शाह यांनाही आमंत्रित केल्याची पोस्ट शेअर केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!