April 21, 2026 11:06 pm

*आधी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार,आता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बॅलिवूडमध्ये पुन्हा एकदा भाईगिरी आणि गँगवॉरचा थरार सुरू झालाय की काय? असा प्रश्न पडण्यासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, आता सुपरस्टार रणवीर सिंगला  थेट धमकीचा मेसेज आला आहे.

या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीच्या घराबाहेर फायरिंग झाली होती, ज्यामुळे इंडस्ट्री हादरली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी, भीतीचं वातावरण कायम आहे. आता हे प्रकरण शांत होत नाही तोच, रणवीर सिंगला एका व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये आरोपीने रणवीरकडे कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. या धमकीनंतर रणवीरने तातडीने मुंबई पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रणवीर सिंगच्या घराबाहेरची सुरक्षा  वाढवली आहे. सध्या पोलीस सायबर सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. रोहित शेट्टीच्या घरावर झालेला हल्ला आणि रणवीरला आलेली धमकी यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? पोलीस या अँगलनेही तपास करत आहेत. दरम्यान, रोहित शेट्टीने खबरदारी म्हणून मित्रमंडळी आणि नातेवाईकांना सध्या घरी न येण्याचा सल्ला दिला आहे. सलमान खान पाठोपाठ आता रणवीर सिंगलाही टार्गेट केल्याने कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!