April 21, 2026 9:36 pm

*अमरावती हादरली! शाळकरी मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमरावतीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. ५ नराधमांनी या मुलीला बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तुझे मुलांसोबत लफडे आहे. आम्ही तुझी बदनामी करू, अशी धमकी देऊन आरोपींनी पीडित मुलीसोबत वारंवार हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलगी ३ महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला बदनामीची भीती दाखवत ५ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी ३ महिन्यांची गरदोर राहिली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात ९ फेब्रुवारीला पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होते. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी शाळेतून घरी जात होती. त्यावेळी साईनाथ (१८ वर्षे) आणि अजिंक्य (१८ वर्षे) या दोन मुलांनी पीडित मुलीला रस्त्यात अडवले. तुझे मुलांसोबत लफडे आहे, आम्ही तुझी बदनामी करू अशी धमकी त्याने दिली. पीडितेला आरोपींनी विरूळ रॉघे मार्गावरील एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर कार्तिक शेलोकार (१८ वर्षे), साहिल (१८ वर्षे) आणि संकेत काळे (२२ वर्षे) हे तिघे घटनास्थळी आले. त्यांनी देखील पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला.

आरोपी पीडित मुलीला सतत धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते. आरोपींनी पीडितीचं जगणं नकोसे केले होते. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर पीडित मुलगी ३ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या घटनेमुळे अमरावती हादरली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!