April 21, 2026 9:37 pm

*अभिषेक शर्मा रुग्णालयात; भारताचा ‘नवा भिडू’ तयार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात भारतीय फलंदाजी काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसले.

अभिषेक शर्मा रुग्णालयात, ‘प्लॅन बी’ तयार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शर्मा रविवारी गौतम गंभीरच्या घरून टीम इंडियाच्या डिनरमधून लवकर निघून गेला. पहिल्या सामन्यानंतर अभिषेक शर्मा आणि मोहम्मद सिराजने पोटदुखीची तक्रार केली होती. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकची तब्येत बिघडल्याची तक्रार केली होती. जसप्रीत बुमराहलाही तापामुळे पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यातच आता भारतीय संघ अभिषेक शर्माच्या जागी एका अनुभवी सलामीवाराला संघात संधी देऊ शकेल. हा सलामीवीर म्हणजे संजू सॅमसन.

संजू सॅमसनला संधीचं सोनं करावं लागेल

जसप्रीत बुमराह तंदुरुस्त आहे असे सांगण्यात आले आहे. पण अभिषेकच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. त्यामुळे, १२ फेब्रुवारीपर्यंत तो दुसऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. जर अभिषेक तंदुरुस्त नसेल, तर संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनने दुसऱ्या सामन्याआधी बराच वेळ घाम गाळला आणि नेट्समध्ये इशान किशनसोबत सराव केला.

दरम्यान, भारतीय संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील आपला दुसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह संघात सामील झाला आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. जर बुमराह उपलब्ध असेल तर एका खेळाडूला वगळावे लागेल. अशा परिस्थितीत, अर्शदीप सिंग किंवा मोहम्मद सिराज यापैकी एकाचा बळी जाऊ शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!