April 23, 2026 4:58 pm

*जमीन फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला ९ वर्षांनंतर बेड्या!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहारात फसवणूक करून गेल्या तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला अखेर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. संदीप दिनकर खांगळ (वय ४५, रा.राधाई को-ऑप. सोसायटी, अशोकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पिंपळगाव बहुला शिवारातील गट क्रमांक १९४ मधील भूखंड क्रमांक १६ या जमिनीच्या व्यवहारात संदीप खांगळ व त्याच्या साथीदारांनी संगनमताने बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच बनावट दस्तऐवज तयार करून फिर्यादी महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल होता.

या गुन्ह्यातील संशयित गेल्या नऊ वर्षांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि साहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सातपूर येथील अशोक नगर परिसरात सापळा रचून आरोपीस अटक केली.

अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई युनिट दोनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोलिस अंमलदार महेश खांबळे, सुनील खैरनार आदींच्या पथकाने केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!