April 23, 2026 3:36 pm

*मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यात वाकसाई ते कार्ला फाटा दरम्यान चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर असलेल्या दोन ट्रक आणि एका पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक दिली.

अपघात विचित्र आणि मोठा असला तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे काही काळ जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, ट्रक चालक अतिवेगाने वाहन चालवित असल्याने वारंवार होणाऱ्या अपघातांचे प्रमुख कारण वेग हेच असल्याचे घटनेतून दिसून येत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाल्यानंतर जवळपास 32 तास मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांच्या अभावावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘मिसिंग लिंक’ हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सर्वात धोकादायक घाट मार्गाला पर्याय देण्यासाठी प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा ६,६९५ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, खंडाळा घाटातील धोकादायक वळणे वगळून प्रवासाचा वेळ २५-३० मिनिटांनी कमी करणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!