April 23, 2026 3:38 pm

*कामावरून काढल्याचा राग अन् गॅस टँकरला लावली आग

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सणसवाडी (ता. शिरूर) येथे कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका चालकाने चक्क गॅस टँकर पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी सोपान उत्तम चव्हाण या चालकावर गुन्हा दाखल केला असून, त्याने कंपनीचा नायट्रोजन गॅस टँकर पेटवून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील सिनर्झी कंपनीच्या मालकीच्या एम एच १२ एन एक्स २८१९ या नायट्रोजन गॅस टँकरवर सोपान चव्हाण हा चालक म्हणून कार्यरत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून तो दारू पिऊन वाहन चालवत असल्याने कंपनी व्यवस्थापनाने त्याला कामावरून काढून टाकले होते.

याच रागातून सोपानने संतापून टँकरच्या पुढील भागाला आग लावून दिली. सुदैवाने, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत टँकरला लागलेली आग विझवली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.कंपनी व्यवस्थापनाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, सोपान चव्हाण यानेच टँकर पेटवल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी अंकुश अरुण माळी (वय ४०, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोपान उत्तम चव्हाण (रा. सणसवाडी, मूळ रा. संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार राकेश मळेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!