April 23, 2026 3:32 pm

*भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी झटका दिला. विशेष एमपीएमएलए न्यायालयाने खडसे आणि त्यांच्या पत्नी गैरहजर राहिल्याने दोघां विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून सुनावणी 13 फेब्रुवारीला निश्चित केली.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे बंड गार्डन पोलिस ठाण्यात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खडसे यांनी मंत्री असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची 40 कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि सुनेच्या नावे 3.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला. या प्रकरणात ईडीने चौकशी सुरू करीत 2021 मध्ये गुन्हा दाखल केला.

3 डिसेंबर 2025 रोजी विशेष न्यायालयाने भोसरी येथील जमीन विक्रीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. विशेष न्यायालयाने 16 जानेवारी रोजी आरोपींवर आरोप निश्चित करणार असल्याचे स्पष्ट केले होते. कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!