April 23, 2026 4:55 pm

*पावापुरी दर्शनासाठी आले अन् काळाने घातली झडप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बिहारमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ राजगीर येथील दिगंबर जैन धर्मशाळेतील  एका खोलीत बंगळूर येथील चार पर्यटक संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून, ते बंगळूरचे रहिवासी होते. त्यांनी राजगीरला येण्यापूर्वी नेपाळला भेट दिल्याची माहिती आहे.

धर्मशाळेच्या रजिस्टरनुसार ३१ जानेवारी रोजी त्यांनी खोली बुक केली होती आणि पावापुरी दर्शनासाठी आले होते. जवळच्या रहिवाशांना खोलीतून दुर्गंधी येत असल्याची शंका आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी खोली उघडली असता चौघेही मृतावस्थेत आढळले.

घटनास्थळ सील करण्यात आले असून, पाटणा येथील एफएसएल पथक तपास करीत आहे. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतांच्या मोबाईलद्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!