April 23, 2026 4:43 pm

*आजारी ७५ वर्षीय महिलेवर अत्याचार, पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आजारी ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला दवाखान्यात नेऊन परत आणताना तोंडात रुमाल घालून बलात्कार करणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली. याबाबत पीडित ज्येष्ठ महिलेने पौड पोलिसात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संजय पवार यांनी ८ साक्षीदार तपासले. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सत्र न्यायाधीश पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, हवालदार अल्ताफ इनामदार, अकबर शेख यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.

पीडिता ही आरोपीच्या नात्यातील आहेत. पीडिता आजारी होती. त्यावेळी दवाखान्यात घेऊन गेला. परत येत असताना फिर्यादीच्या मुलाच्या अर्धवट बांधकामावर घेऊन गेला. तेथे फिर्यादीला जमिनीवर पाडून, धमकावून, फिर्यादी ओरडू नये, यासाठी तोंडात रुमाल घालून बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगू नको, असे म्हणून निघून गेला. फिर्यादी पायी घरी गेली. मुलाला घेऊन जाऊन पौड पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे दाव्यात वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील संजय पवार यांनी केली. दरम्यान, सद्यस्थिती पाहता सध्याचे आरोपीचे वय हे 65 वर्ष आहे. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पण, आरोपीने 75 वर्षीय पीडित महिलेबाबत केलेली कृती हा गंभीर गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाची शिक्षा सुनावली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!