April 23, 2026 4:49 pm

*नालासोपारा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नालासोपारा रेल्वे स्थानकात आठवड्याभरात तब्बल तीन मोबाईल चोरीच्या उघडकीस आल्या आहेत. मोबाईल चोरी प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीसह मोबाईल चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्याभरात नालासोपारा रेल्वे स्थानकात तब्बल तीन मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातली पहिली घटना शुक्रवार, ३० जानेवारी रोजी घडली.

नालासोपारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरून ७ हजार किंमतीचा मोबाईल चोरीस गेला होता. तर दुसऱ्या दोन घटनांमध्ये नालासोपारा रेल्वे स्थानकातून ५२ हजार १६० रुपये किंमतीचा मोबाईल आणि महिलेचे पाकीट तसेच ९ हजार किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता.

याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. रेल्वे स्थानकावर पाळत ठेऊन तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अधिकाऱ्यांनी ऋषभ गुप्ता (३०), लखेंद्र दास (१९) आणि आकाश भौमिक (२९) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी वसई रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!