April 23, 2026 3:22 pm

*हळदीच्या दिवशीच नवरदेवाच्या दुकानाला भीषण आग

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

एका बाजूला लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे नियतीने मात्र अत्यंत क्रूर डाव मांडला. केज येथील शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या एका प्लम्बिंगच्या दुकानाला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

या आगीत नवरदेव असलेल्या दुकानदाराचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या दिवशी दुकानदाराची हळद आणि लग्न होते, त्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना त्यांना धुराचे लोट दिसले. त्यांनी वेळ न घालवता तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे ही आग शेजारच्या दुकानांपर्यंत पसरली नाही, अन्यथा संपूर्ण मार्केट आगीच्या विळख्यात आले असते.

३० लाखांचे साहित्य जळून खाक

या आगीत दुकानदार उद्धव अंगद लांब यांचे फर्निचर, पाईप, पाण्याच्या टाक्या, सॅनिटरी वेअर आणि प्लम्बिंगचे सर्व महागडे साहित्य जळून खाक झाले आहे. उद्धव यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे होता. विवाहासाठी ते गावी गेले असताना ही घटना घडली. ही बातमी मिळताच ते हळदीच्या अंगानेच केजला धावून आले.

घातपाताचा संशय

आगीच्या स्वरूपामुळे नवरदेव उद्धव लांब यांनी संशय व्यक्त केला आहे की, ही आग लागली नसून कुणीतरी लावली असावी. याप्रकरणी त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून शुक्रवारी ते पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद देणार आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांचा विवाह पार पडला, तरी या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!