April 23, 2026 4:54 pm

*अकॅडमी चालक जावेदचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधून, तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येथील रनर्स अकॅडमीचा चालक जावेद शेख (हल्ली रा.जकातेनगर, श्रीगोंदे) याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती नोव्हेंबर २०२४ पासून रनर्स अकॅडमीमध्ये सरावासाठी जात होती. एके दिवशी पीडितेने आपला पाय लचकल्याचे प्रशिक्षक जावेद शेख यास सांगितले. त्यावेळी त्याने तिला दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानावर बोलविले. त्यावेळी स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने तो पीडितेला स्पर्श करू लागला.

तिने विरोध करूनही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. सदरबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर धमकी देऊन आरोपीने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.

जानेवारी २०२५ मध्ये पीडितेचे पोट दुखू लागल्याने ती शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेली. तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने ही बाब जावेद शेख याला सांगितली. त्यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह पीडितेच्या खोलीजवळ जाऊन तिला गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्याने तिचा गर्भपात झाला. लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!