April 23, 2026 5:00 pm

*वाहतूक कोंडीचा मनस्ताप, उद्योजकानं थेट हेलिकॉप्टर मागवून गाठलं पुणे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई – पुणे दृतगती महामार्गावरील अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर ३२ तासांनी वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतूक कोंडीचा हजारो वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

प्रशासनाने पहाटे दोनच्या सुमारास टँकर हटवल्यानंतर अखेर वाहतूक सुरळीत झालीय. या वाहतूक कोंडीचा सामना प्रसिद्ध उद्योजक डॉ. सुधीर मेहता यांना देखील करावा लागला. पण, मेहता यांनी आठ तास कोंडीत अडकून पडल्यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने पुणे गाठले.

मुंबई – पुणे दृतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

रायगड जिल्ह्यातील आडोशी येथील बोगद्याजवळ मंगळवारी (०३ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या टँकरमध्ये प्रॉपायलीन हा अतिज्वलनशील गॅस होता. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीचा हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ३२ तास या कोंडीत अनेकजण अडकून पडले होते.

उद्योजक डॉ. सुधीर मेहताही कोंडीत अडकले

पुणं- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीत प्रसिद्ध उद्योजक डॉ. सुधीर मेहता देखील अडकून पडले. मेहता कोंडीत अडकल्याची माहिती त्यांनी एक्सवर एक पोस्टद्वारे दिली होती. “मुंबई – पुणे महामार्गाची ही अवस्था आहे. प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मुख्य महामार्गाची दयनीय अवस्था आहे”, अशी व्यथित पोस्ट मेहता यांनी केली होती.

आठ तासांनी हेलिकॉप्टरने गाठले पुणे

सुधीर मेहता आठ तास या वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. आठ तासानंतर त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुणे गाठले. “अशा परिस्थितीत महामार्गावर प्रवासी, वाहनांना माघारी जाण्याचा मार्ग तयार करुन दिला पाहिजे. हेलिपॅडसाठी दहा लाख रुपये आणि एक एकर जमिनीची गरज असते. कोंडी झाल्यावर तिथून बाहेर पडता येण्यासाठी महामार्गावर काही ठिकाणी अशी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे”, अशी सूचना देखील मेहता यांनी केली आहे.

टँकर हटवला पण वाहतूक संथ गतीने

अपघातग्रस्त टँकर हटवण्यात आला असून, पहाटेपासूनच महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. पण, अद्यापही काही भागात अनेक वाहने अडकून पडली असल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. लोणावळा, तळेगाव, मळवली याभागात वाहतूक संथ गतीने सुरु असल्याची माहिती वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!