April 23, 2026 3:43 pm

*घोडबंदर रोडवर भयानक अपघात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईच्या उपनगरातील सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या घोडबंदर रोडवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत सूस्साट बाईक चालवल्याचा नाद एका तरूणाच्या जीवावर बेतला आहे.त्याचं झालं असं की संध्याकाळच्या सुमारास या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.

अशा वर्दळीच्या मार्गावर सूस्साट बाईक चालवताना एक बाईक स्वार थेट ट्रकच्या चाकाखाली आला होता.त्यामुळे बाईकची ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटने बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगराच्या दिशेने जाणारा घोडबंदर रोडवर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते.त्यात संध्याकाळी 4 नंतर तर चाकरमानी आपल्या घराच्या दिशेने जात असतात. त्यामुळे या मार्गावर प्रचंड ट्रॅफीक असते.त्यामुळे या मार्गावरून गाडी चालवणे प्रचंड कसरतीचे असते. अशात काही बाईकस्वार अतिघाई करायला जातात आणि जिवाला मुकतात, अशीच काहीशी घटना आज घडली आहे.

मिरा भाईंदर जवळील घोडबंदर रोडवरून प्रवास करताना एक बाईकस्वार सुस्साट गाडी चालवत होता. या मार्गावर प्रचंड वाहनांची वर्दळ असल्याने वाहने हळू हळू चालतात. मात्र हा बाईकस्वार जोरात गाडी पळवण्याचा नादात थेट ट्रकच्या मागच्या बाजूस धडत देऊन बसला होता. ही धडक इतकी भीषण होती की बाईकस्वार अर्धा ट्रकच्या मागच्या बाजूच्या आत शिरला होता.या घटनेत तरूणाने हेल्मेट घातले होते, मात्र तरी देखील त्याचा जीव वाचू शकला नाही, इतका भयानक हा अपघात होता.

घोडबंदर रोडवर रस्त्यांचे काम सुरू आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरूंद झाली आहेत, या अरूंद रस्त्यामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तरूणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या अपघातात मृत झालेल्या तरूणाचे नाव कळू शकले नाही आहे.पण या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तसेच या मार्गावरील अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!