April 23, 2026 3:44 pm

पुण्याचे नाव जागतिक पातळीवर उज्वल !

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रा. डॉ. अमोल भोसले यांची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप यशस्वी

पुणे प्रतिनिधी – ज्योतिबा सावंत

पुणे शहराच्या शैक्षणिक परंपरेला जागतिक स्तरावर नवा गौरव मिळवून देणारे यश प्रा. डॉ. अमोल भोसले यांनी संपादन केले आहे. त्यांनी जागतिक स्तरावरील ‘पोस्ट डॉक्टरल फेलोशिप’ (Post Doctoral Fellowship) यशस्वीरीत्या पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात नवी उंची गाठली आहे.

ही मानाची फेलोशिप पुण्यातील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील प्रसिद्ध वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (USA) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संशोधन कार्यक्रमात प्रा. डॉ. भोसले यांनी मोलाचे आणि अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे.

या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांना
1. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधील शैक्षणिक देवाणघेवाण
2. प्रगत संशोधन तंत्रज्ञानाचा सखोल अनुभव
3. जागतिक पातळीवरील संशोधन पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.

प्रा. डॉ. अमोल भोसले यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे पुणे आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!