April 23, 2026 9:19 pm

*३० वर्षे जुन्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वसई पश्चिम नवपाडा या परिसरात एक दोन मजल्यांची ३० वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी आहे; पण ती टाकी अनेक वर्षांपासून विनावापर आहे. शनिवारी (ता. ३१) या टाकीचे तोडकाम सुरू होते. याच वेळी मजुरांना त्या ठिकाणी मानवी कवठी, हाडांचा सापळा असा सांगाडा दिसून आला.

तत्काळ याची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली असता, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तो मानवी सांगाडा ताब्यात घेत जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पाण्याच्या टाकीत हा हाडांचा सांगाडा सापडल्याने सध्या प्राथमिक आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी हत्या की आत्महत्या याचा सर्वांगाने तपास सुरू केला आहे.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास आम्हाला मानवी सांगाडा सापडल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे तोडकाम सुरू होते. कपडे, कवठी, हाडे आम्हाला सापडली आहेत. हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुरू असून, आम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!