April 20, 2026 4:25 am

*जुन्या भांडणाच्या रागातून नातेवाईक महिलेवर गरम पाणी ओतून मारहाण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भुकुम (ता. मुळशी) येथील खाटपेवाडी परिसरात जुन्या वादाच्या रागातून एका व्यक्तीने नातेवाईक महिलेवर गरम पाणी ओतून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत निवृत्ती पवार (रा. खाटपेवाडी, भुकुम, ता. मुळशी, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व फिर्यादी महिला यांच्यात यापूर्वी काही कारणावरून भांडण झाले होते. त्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हा अमानुष प्रकार केल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर त्याने गरम पाण्याची बादली थेट महिलेच्या पायावर ओतली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिच्या तोंडावरही मारहाण केल्याने तिला अधिक दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे. पीडित महिलेने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलिस करत असून आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!