April 20, 2026 1:06 am

*बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला आहे. शनिवारी मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर अज्ञात व्यक्तींविरोधात BNS आणि आर्म्स अ‍ॅक्टच्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांचकडून 12 विशेष पथकं तयार करण्यात आली असून, त्यांच्या अटकेसाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे.

रोहित शेट्टी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक असून ‘गोलमाल’, ‘सिंघम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.

नेमकं घडलं काय? 

मुंबईतील जुहू परिसरात आज (1फेब्रुवारी) बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी पाच राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. घटना घडली त्यावेळी रोहित शेट्टी घरात होता की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता, हेही अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साक्षीदारांची चौकशीही सुरू आहे. पोलीस अधिक तपशील गोळा करत असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

नेमकं कोणी हल्ला केला?

दरम्यान, 2024 मध्ये अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरही अशाच प्रकारची गोळीबाराची घटना घडली होती. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चार राउंड गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले होते. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर स्वीकारली होती. त्या घटनेनंतर सलमान खान यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. आता रोहित शेट्टीचे घर असलेल्या बिल्डिंगवर नेमकं कोणी हल्ला केला? त्या मागे काय हेतू होता ? याचा माग पोलिस काढत आहेत. परिसरातील सीसीटिव्हींच्या मदतीने आरोपींचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!