April 19, 2026 11:31 pm

*शिवम संजीव हुजूरबाजार यांच्या कला प्रदर्शनाचे विद्यापीठ परिसरात उद्घाटन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक विद्यापीठातील स्कूल ऑफ आर्ट्स, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन अँड डिझाईन (SAMVED) आणि शिवम संजीव हुजूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्जनशीलता आणि समकालीन कलेचा उत्सव साजरा करणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रदर्शन खुले करण्यात आले होते.

प्रसिद्ध कलाकार अमित धने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, चित्रकार शिवम संजीव हुजूरबाजार व संजीव हुजूरबाजार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर तसेच अधिष्ठाता डॉ. अविनाश काटे हे उद्घाटनप्रसंगी मान्यवर म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांनी विद्यापीठाच्या सर्जनशीलता आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांवर प्रकाश टाकला. कला प्रदर्शनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवे दृष्टिकोन मिळतात आणि समाजाशी अर्थपूर्ण संवाद साधता येतो, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुणे चित्रकार अमित धने यांनी ललित कलेचे शिक्षण संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार व्यक्तिमत्त्व घडविण्यास महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अशा सहकार्यपूर्ण उपक्रमांमुळे शैक्षणिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कलाविष्कार यामधील दरी भरून निघते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी शिवम संजीव हुजूरबाजार यांनी तरुणांमध्ये कला आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. कला समाजात सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये, असे त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनाला विद्यार्थी, कलाकार, प्राध्यापक व कर्मचारी तसेच विविध वयोगटांतील कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

तरुण कलाकार शिवम हुजूरबाजार यांनी पारंपरिक शैलींसोबतच प्रयोगशील तंत्रांचा वापर करत आपली कला सादर केली, तर चित्रकलेतून निसर्ग, मानवी भावना आणि सामाजिक सलोखा या विषयांचा वेध घेण्यात आला.

डॉ. अविनाश काटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी, कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांनी शिवम हुजूरबाजार यांना त्यांच्या चित्रकला व कला प्रदर्शनाबद्दल अभिनंदन केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!