April 20, 2026 12:50 am

*शीवजवळ धावत्या लोकलमधून तीन प्रवासी रुळांवर पडले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लोकलमधील गर्दीमुळे झालेल्या वादातून एका शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच धावत्या लोकलमधून तीन प्रवासी रुळांवर पडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्य रेल्वेच्या शीव स्थानकात घडली. त्यातील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. गर्दीच्या रेट्यामुळे प्रवासी रुळांवर पडल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

अफजल चौधरी, सचिन विश्वकर्मा आणि जेनिल सय्यद अशी या प्रवाशांची नावे आहेत. त्यांनी शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळी कुर्ला रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी धीमी लोकल पकडली. तिघांनी दरवाज्यातून आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकल सुरू झाल्यानंतरही गर्दीमुळे त्यांना दरवाज्यातच उभे राहावे लागले. सकाळी पावणेदहाच्या सुमारास लोकल शीव स्थानकाजवळ पोहोचताच तिन्ही प्रवासी रुळांवर पडले.

धावत्या लोकलमधून प्रवासी पडल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले. तिघांपैकी अफजल चौधरी यांची प्रकृती चिंताजनक आहे. सचिन आणि जेनिल यांना किरकोळ जखमा झाल्या असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा काही काळ बंद करण्यात आला होता.

गर्दीच्या वेळेत लोकल खोळंबल्याने ‘सीएसएमटी’ला जाणाऱ्या लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. जखमी प्रवाशांना रुळांवरून बाजूला केल्यानंतर ‘ओएचई’मधील विद्युत पुरवठा पूर्ववत करून लोकल पुन्हा सुरू करण्यात आल्या, अशी माहिती मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!