April 19, 2026 9:48 pm

*स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपणाचा संकल्प

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सोरटेवाडी (ता. बारामती) येथे शोकसभेचे आयोजन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. गावाच्या प्रगतीचा पाया अजित पवारच होते अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला गेला.

सोरटेवाडी या गावात रस्ते, पाणी, वीज, गटार योजना यासह पवार यांनी अनेक पदे दिली. या योगदानाबद्दल शोकसभा आयोजित करून आजी-माजी सरपंचांनी पवार यांचे मदतकार्य, भेटीगाठी यास उजाळा दिला. सभेत सरपंच भारती सोरटे, माजी सरपंच दत्तात्रेय शेंडकर, माजी उपसरपंच विकास पवार, दमयंती सोरटे आदींनी पाणावलेल्या डोळ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच रणजित सोरटे, माजी सरपंच मधुकर सोरटे, श्रीपाल सोरटे, नवनाथ शेंडकर आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. हरिदास सोरटे, सुरेश मासाळ, नरेश खोमणे, विजय शिरतोडे, राजेंद्र करचे, कांतिलाल जाधव, सागर बांदल, ग्रामसेविका भालेराव आदी उपस्थित होते. नितीन सोरटे यांनी सूत्रसंचालन केले.

सरपंच भारती सोरटे यांनी, मागील काही वर्षात गावाचा विकास झाला तो फक्त अजित पवार यांच्यामुळे अशी प्रशस्ती करत कामांची यादीच सांगितली.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!