April 20, 2026 12:48 am

साताऱ्याच्या गुन्हेगारीचं काळं वास्तव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचं चित्र दिवसेंदिवस अधिक भयावह होत चाललं असून, केवळ खून, मारहाण, टोळीयुद्ध इतक्यावरच न थांबता आता अनैतिक व्यवसाय, छमछमाट, हनी ट्रॅप आणि फार्महाऊस सेफ हाऊस असा संपूर्ण गुन्हेगारी इकोसिस्टीमच तयार झाल्याचं वास्तव समोर येत आहे. गेल्या १० वर्षांपासून सातारा व पाचगणी परिसरात डान्सबारसदृश प्रकार सुरू असल्याचे पोलिस गुन्हे दाखल होत असतानाही, या सगळ्या प्रकारांना कोणाचा आशीर्वाद आहे? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

कॅफेंमधून कुसंस्कृतीचा शिरकाव

सातारा शहर आणि जिल्ह्यातील कॅफेंमध्ये खुलेआम नंगानाच, अश्लील चाळे सुरू असल्याचे अनेकदा पोलिस कारवाईत उघड झाले आहे. नियमांनुसार कॅफेंमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पारदर्शक काचा, काळ्या काचा नसणे बंधनकारक असतानाही, बहुतांश कॅफे चालक हे नियम धाब्यावर बसवत आहेत.

याचा थेट परिणाम शाळा–महाविद्यालयातील विद्यार्थी, टुक्कार पोरं यांच्यावर होत असून, ही पिढी कॅफे संस्कृतीच्या कचाट्यात अडकत आहे. शेकडो कॅफेंवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी कारवाई टिकाऊ ठरत नसल्याचं चित्र आहे.

लॉज – गुन्हेगारीचं दुसरं केंद्र

शाळा व महाविद्यालयांच्या आसपासच लॉज थाटले जात असून, नियमांनुसार अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देणे बेकायदेशीर आहे. मात्र प्रत्यक्षात ओळखपत्र, वय तपासणी न करता केवळ ५०० रुपये अधिक मिळाले की लॉजमध्ये सहज प्रवेश दिला जातो.

पोक्सोचा गुन्हा दाखल झाला की संबंधित हॉटेल–लॉजचे नाव समोर येते, तोपर्यंत मात्र “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असा प्रकार सुरू असतो, अशी चर्चा खुलेआम आहे.

छमछमसाठी सातारा–पाचगणी ‘खुशकीचं ठिकाण’

सातारा व पाचगणी परिसरात छमछमाटासाठी खास ठिकाणं तयार झाल्याचा पॅटर्नच तयार झाला आहे. पोलिसांकडून वर्षातून एखादा-दोनदा छापे टाकले जातात. या छाप्यांमध्ये हायप्रोफाईल उद्योजक, व्यावसायिक सापडून बदनाम होतात. मात्र या सगळ्याचं व्यवस्थापन भानगडबाज, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून केलं जात असल्याचं वास्तवही समोर येत आहे.

सोशल मीडियातून टोळीयुद्ध आणि खून

साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडलेला टोळीयुद्धातून खून हा गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाचं टोकाचं उदाहरण आहे. पोलिस तपासात इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट, मुलीच्या नावाने हनी ट्रॅप करून प्रतिस्पर्धी गुंडाला बोलावणे आणि भरदिवसा गोळ्या झाडणे असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुंडांसाठी सेफ हाऊस ठरतायत फार्महाऊस

मुंबई, पुणे किंवा स्थानिक पातळीवर कांड केल्यानंतर गुंड, भानगडबाज थेट साताऱ्यातील दुर्गम भागातील फार्महाऊसवर आश्रय घेत असल्याचं समोर आलं आहे.

मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात दारू, जेवण, निवासाची पूर्ण सोय करून गुन्हेगार आठवड्यांपासून महिनाभर लपून राहत आहेत. ही लपाछपी अगदी खुलेआम सुरू असल्याचं बोललं जात आहे.

हनी ट्रॅप – नव्या गुन्हेगारीचं भयावह रूप

गेल्या चार वर्षांत साताऱ्यात हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना लक्ष्य करून मुली किंवा महिलांच्या माध्यमातून जाळ्यात अडकवलं जात आहे.धक्कादायक बाब म्हणजे अशा अनेक घटना बाहेरच येत नाहीत. तक्रार झालीच तर तपासात या बाबी दुर्लक्षित राहतात. हनी ट्रॅप ही साताऱ्यासारख्या शांत जिल्ह्यालाही पोखरणारी नवी गुन्हेगारी बनत असल्याचं वास्तव आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!