बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं असून, आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पारथिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. निधनाची बातमी समोर येताच खासदार सुप्रिया सुळेंनी उध्वस्त अशा एका शब्दाचा स्टेटस ठेऊन आपली व्यथा मांडली होती. परंतु, पहाटे सुमारे 1.44 वाजता त्यांनी पुन्हा एकदा स्टेटस ठेवला असून, त्याची चर्चा राज्यभर होत आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी, भावना आणि नात्यांची जाणीव करून देणारा क्षण खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मोबाईल स्टेटसद्वारे सर्वांसमोर आणला आहे. अजित पवार यांच्या मृत्युंनंतर सुप्रिया सुळे या मनातून भाऊक झाल्याचे पहायला मिळत आहे. पहाटे सुमारे 1.44 वाजता त्यांनी ठेवलेला एक साधा, पण अंतर्मुख करणारा स्टेटस सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
विधानभवनातील सभागृहात लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर अजित पवार यांचा फोटो आणि त्यांच्याशी संबंधित माहिती झळकत असलेला हा फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसला ठेवला असून, त्यावर फक्त दोनच शब्द लिहिले आहेत “Heartbreaking”. यामुळे त्यांच्या मनात असलेळ्या भावाबद्दलचे प्रेम दिसून येत आहे.
या स्टेटसमध्ये कुठलेही राजकीय वक्तव्य नाही, कुठलाही आरोप नाही, कुठलीही स्पष्टीकरणे नाहीत. मात्र, या दोन शब्दांतून उमटणारी वेदना, अस्वस्थता आणि भावनिक दुभंगलेपण अनेकांना जाणवले. एकीकडे कुटुंब, दुसरीकडे राजकारण… या दोहोंच्या संघर्षातील वेदना या स्टेटसमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.
पवार कुटुंबातीलराजकीय फाटाफुटीनंतर अनेक प्रसंग घडले. मात्र, सुप्रिया सुळे यांचा हा स्टेटस केवळ राजकीय नसून वैयक्तिक आणि भावनिक पातळीवरचा आक्रोश असल्याची भावना समर्थक आणि नागरिक व्यक्त करत आहेत. “हे राजकारण नाही, ही वेदना आहे”, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. राजकारणात रोज आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण कधी कधी मौनच सर्वाधिक बोलकं असतं, आणि हाच अनुभव सुप्रिया सुळे यांच्या या स्टेटसमधून येतो. कोणताही शब्द न वापरता त्यांनी जे सांगायचं आहे, ते य“Heartbreaking” या एका शब्दातून महाराष्ट्राने ऐकलं आहे.











