पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रावेत परिसरात असलेल्या ७०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती आढळून आली आहे.
ही गळती नाल्यामध्ये झाल्यामुळे आणि त्या ठिकाणी
विद्युत केबल
इंटरनेट केबल
ड्रेनेज लाईन
पावसाळी लाईन
अशा अनेक सेवा वाहिन्या असल्याने, दुरुस्तीचे काम करणे अत्यंत जटिल व धोकादायक बनले आहे. सातत्याने प्रयत्न करूनही गळती थांबवणे शक्य झाले नाही.
महत्त्वाचा निर्णय
तांत्रिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने या जुन्या जलवाहिनीऐवजी नवीन पर्यायी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आली आहे.
कामाचा कालावधी
जलवाहिनी सुमारे २० फूट खोल असल्याने
हायप्रेशर दलदलीची परिस्थिती व इतर सेवा वाहिन्यांमुळे अडथळे येत आहेत
त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार आहे.
पाणीपुरवठ्याबाबत माहिती
या कालावधीत संबंधित जुनी जलवाहिनी बंद ठेवण्यात आली असून,
पर्यायी पाण्याच्या लाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
तथापि, नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे.
प्रभावित परिसर
कळस माळवाडी
जाधववस्ती
गणेशनगर (बोपखेल)
विश्रांतवाडी (अंशतः)
म्हस्के वस्ती
संजय पार्क
वर्मा शेल
विमानतळ व सभोवतालचा परिसर
नागरिकांना आवाहन
वरील सर्व परिसरातील नागरिकांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











