April 20, 2026 12:47 am

गिरीश महाजन तुम्ही लवकर राजीनामा द्या’, लक्ष्मण हाके यांची मागणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गिरीश महाजन यांनी देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही. आपल्याकडून अनावधानाने बाबासाहेबांचा उल्लेख करणं राहून गेलं, असं नंतर गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. पण गिरीश महाजन यांनी बाहासाहेबांचा उल्लेख न केल्याने वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदवला. यानंतर संपूर्ण राज्यात या प्रकरणाची दखल घेण्यात आली. या घटनेवर आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

“नाशिकमध्ये जी आज घटना घडली आहे, प्रजासत्ताक दिनी मंत्री महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही. मंत्री गिरीश महाजन ही अक्षम्य अशी चूक आहे. गिरीश महाजन तुम्ही लवकर राजीनामा दिला पाहिजे. एवढं गांभीर्य तुमच्या या चुकीमध्ये आहे. माधवी जाधव नावाच्या वन कर्मचाऱ्यांनी वर्दीवर असताना सुद्धा ज्या पद्धतीने निषेध नोंदवला त्यांच्या या धाडसाला देशभरातील सामान्य नागरिकांनी सलाम केला पाहिजे”, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली.

 

आपली वर्दी राहील की नाही याची जरा सुद्धा तमा न बाळगता जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे धाडस दाखवलं त्या धाडसाला सलाम. महाजन साहेब तुम्ही आणि तुमचा पक्ष, घटनात्मक मूल्य पायदळीच तुडवत आहात तुम्ही आधी राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

 

“माधवी ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नोकरीची तमा न बाळगता एका सामान्य व्यक्तीने मंत्रीपदावरच्या जबाबदार व्यक्तीला कर्तव्याची आठवण करुन दिली. तेही एका नोकरीमध्ये असणाऱ्या भीम कन्येने आठवण करुन दिली. खरोखर भारताचे संविधान धोक्यात असताना, सामान्य नागरिकाचे हक्क, कर्तव्य धोक्यात असताना सत्ताधाऱ्यांकडून संविधानाचा वारंवार अवमान केला जात असताना, माधवी ताई तुम्ही जे धाडस दाखवलं त्याला सलाम”, असं लक्ष्मण हाके यांनी केलं.

 

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!