April 20, 2026 2:20 am

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्गजांना पद्म पुरस्कारांनी उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. यामध्ये पाच राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार

भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपाल म्हणून ते संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळीदेखील भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापनेवेळीदेखील भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

 

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत असतानाच गोव्याच्या राज्यपालपदाचादेखील अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीदेखील होते. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावद आणि महापुरुषांबद्दलच्या काही वक्तव्यांमुळे ते वादात सापडले होते.

 

व्ही. एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते 2006 ते 2011 या काळात केरळचे मुख्यमंत्री होते. ते माकपचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठा लढा दिला होता. तसेच कामगार नेता म्हणूनही त्यांची मोठी कारकीर्द राहिली आहे. त्यांचे 21 जुलै 2025 रोजी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यांच्या कार्याच्या सन्मानासाठी त्यांना केंद्र सरकारकडून सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या मारणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. शिबू सोरेन हे तीनवेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले होते. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक होते. झारखंड राज्याच्या निर्मितीसाठीच्या लढ्यात त्यांचं मोठं योगदान होते. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे ते नेते होते. त्यांचं 4 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 81 व्या निधन झालं होतं. त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे देखील झारखंडचे मुख्यमंत्री आहेत.

 

वि के मल्होत्रा यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते दिल्लीचे 5 वेळा खासदार राहिले होते. त्यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा पराभव केला होता.

 

केरळचे वेल्लापल्ली नटेसन यांनाही पद्मभूषण पुरस्कार

केरळचे एझावा समुदायाचे नेते तथा SNDP Yogam श्री नारायण धर्म परिपालन योगमचे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेसन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी एझावा समुदयाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोलाचं काम केलं आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!