April 20, 2026 3:48 am

ज्येष्ठाना मिळाली उदबोधक संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक कार्याची माहिती

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें
पुणे विद्यापीठ,चतुश्रुंगी_येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठांत संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या विद्यापिठातील वाणिज्य सभागृहात अभिवादन कार्यक्रमात उपस्थीत ज्येष्ठ नागरिकांना जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवन कार्याच्या माहिती बरोबरच संत तुकारामांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य ह्या मधील विविधांगी कार्याची माहिती मोठ्या उदबोधक आणि साध्या सोप्या भाषेत मिळाली.त्यामुळे उपस्थीत ज्येष्ठ नागरीक भाराऊन गेले होते.
निमित्त होते संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे संत तुकाराम महाराज अध्यासन तसेच विद्यापिठातील मराठी विभाग,ज्येष्ठ नागरीक सहाय्यता कक्ष ,बहि:शाल शिक्षण मंडळ विभाग आणि ज्येष्ठांची संघटना अस्काॅप यांचे वतीने संयुक्त रित्या आयोजिलेल्या जयंती उत्सव कार्यक्रमास पुणेशहर,पिंपरी चिंचवड,कात्रज आंबेगांव खुर्द परिसरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद याप्रसंगी शहरात वाहतुकीची अडचण असुन सुद्धा १५०हुन अधिक ज्येष्ठांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचा प्रारंभ सभासद नोंदणीने झाला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाच्या सारिका आवाड यानी ज्येष्ठाना चर्चासत्रातील माहिती नोंद करणेसाठी वही,पेन देऊन आस्थेने सहकार्य केले.त्यानंतर अल्पोपहार,चहापाना नंतर कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गेट पासुन ते सभागृहा पर्यंत संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख गजानन आंभोरे, दिलीप शेठ यांचे मार्गदर्शनाखाली आलेल्या दिंडीने झाला.
प्रारंभी संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यांत आला.आळंदी मधील विद्यार्थ्यानी अभंग गायन केले.
येथे सकाळी ११ते संध्याकाळी ५वाजेपर्यंत ४सत्रे संपन्न झाली.मधल्या वेळांत सहभोजनाचा आस्वाद ज्येष्ठांनी घेतला.या चर्चा सत्रामध्ये संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख गजानन आंभोरे,दिलिप शेठ,हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे,लक्ष्मण क्षीरसागर महाराज,गणेश गरुड,संदीप येवले,संगीता अांभोरे,कृष्णा मंडलकर इत्यादीनी संत तुकाराम महाराजांच्या अलौकिक सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच अस्काॅपचे दिलिप पवार,अनिल रोडे याचीही समयोचित भाषणे झाली. सुमारे४००वर्षापुर्वी पर्यावरणाचे,वृक्षवल्लीचे महत्व संत तुकाराम महाराजांनी सांगितले होते याची आठवण करून दिली.
प्रारंभी विद्यापिठाच्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे संचालक,हरिश्चंद्र नवले यानी सुत्रसंचन करुन कार्यक्रमाची रुपरेषा सांगुन वक्त्यांचा परिचय करून दिला.
चंद्रकांत गुरव, संस्थापक,अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक संघ जांभुळवाडी रोड

1 thought on “ज्येष्ठाना मिळाली उदबोधक संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक कार्याची माहिती”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!