डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डोंबिवलीत (Dombivli News) एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा या मराठी तरुणीने केला होता. दरम्यन या संदर्भात या तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली असता या इंस्टाग्राम पोस्टची दखल आता थेट राज ठाकरे यांनी घेतली आहे. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झाले असून प्रकरणाची माहिती जाणून घेतलीय.
महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल
माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असं म्हणत या तरुणीने खंत मांडली. या इंस्टाग्राम पोस्टची थेट राज ठाकरे यांनी दखल घेतली. तर दुसरीकडे अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झाले असून ते घडलेल्या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेय. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाले आहे. दरम्यान, मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ होताना दिसून आली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
डोंबिवली एकता सावंत ही तरुणी रुल स्टार आहे. तिचे 51 लाखापेक्षा अधिक फॉलोवर असून या तरुणीचे व्हीडीओ मीलीयनमध्ये पाहिले जातात. डोंबिवलीत एकता सावंत या मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते, मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्याना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत आहे. माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असे म्हणत या तरुणीनीने खंत मांडली असता मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले आहे.











