April 20, 2026 4:30 am

तिसऱ्या श्रीराम मंदिर निर्माण दिनानिमित्त पुण्यातील राम मंदिरात दीपोत्सव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्टच्या वतीने तिसऱ्या श्रीराम मंदिर (अयोध्या) निर्माण दिनानिमित्त पुणे विद्यार्थी गृह येथील श्रीराम मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलनाने मंदिर परिसर भक्तिमय आणि मंगल वातावरणाने उजळून निघाला.

 

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आमदार श्री हेमंतजी रासने उपस्थित होते. तसेच कट्टर हिंदुत्ववादी मित्रबंधू श्री तुषारजी दामगुडे, सामाजिक कार्यकर्ते श्री अमोलजी शुक्ल, मित्रबंधू श्री श्रीनिवास (भैय्यासाहेब) निगडे, लोखंडे तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री निलेशजी वावरे, कॅन्सर क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉ. श्रद्धा, ढोल-ताशा महासंघाचे संघटक श्री अनुपजी साठे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

दीपोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम नामस्मरण, भक्तिगीतांचे सादरीकरण व सामूहिक दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी श्रीराम मंदिर उभारणीच्या ऐतिहासिक कार्याचे महत्त्व विशद करत सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रभावना जोपासण्याचे आवाहन केले.

 

या कार्यक्रमासाठी पुणे विद्यार्थी गृह येथील समस्त शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!