April 20, 2026 4:28 am

पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीची परीक्षा पुढे ढकलली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेद्वारे भरण्यासाठी जाहिरात क्रमांक १/१५७९ प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीस अनुसरून पात्र उमेदवारांसाठी दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित व उमेदवार-केंद्रित पद्धतीने राबविता यावी, तसेच परीक्षेदरम्यान उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींचा सखोल आढावा घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

या परीक्षेची नवीन तारीख, वेळ व परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच निश्चित करून अधिकृत संकेतस्थळावर तसेच प्रसारमाध्यमांद्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता फक्त महापालिका प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

परीक्षा पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पुणे महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, भरती प्रक्रिया अधिक सक्षम, नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.

सदर भरती प्रक्रियेबाबत तसेच नव्याने निश्चित होणाऱ्या परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर

https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment

https://www.pmc.gov.in/en/b/recruitment

येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!