April 20, 2026 6:03 am

आळंदीत अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्साहात साजरा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आळंदी येथील श्री आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थान (श्री राम मंदिर) यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन गुरुवारी (दि. २२) उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रायणी नदीकाठावरील श्री राम मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन करीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

अयोध्येत दोन वर्षांपूर्वी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची वेदमंत्रांच्या जयघोषात  प्राणप्रतिष्ठापना झाली होती. त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त आळंदीत हरिनाम गजरात हरिपाठ, श्रींची आरती, वेदमंत्र पठण असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील वारकरी साधकांनी हरिपाठ सेवा रुजू केली.

 

या कार्यक्रमाचे संयोजन आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले. हरिपाठ सेवेचे नियोजन ह. भ. प. रामचंद्र महाराज सारंग व ह. भ. प. रवींद्र भूमकर यांनी केले. यावेळी श्रींचे पुजारी महेश अयाचित, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, आळंदी धाम सेवा संस्थेचे रोहिदास कदम, लक्ष्मण मेदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

वर्धापन दिनानिमित्त भाविकांना रामरक्षास्तोत्र या ग्रंथाचे वाटप करण्यात आले तसेच प्रसाद म्हणून लाडूंचे वितरण करण्यात आले. अध्यक्ष राहुल आवेकर व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!