देश
शहरे
मुंबई
पुणे
नाशिक
नागपूर
लाइफस्टाइल
एंटरटेनमेंट
निवडणूक 2026
प्रदेश
मुंबई-ठाणे
पश्चिम महाराष्ट्र
मराठवाडा
कोकण
विदर्भ
उत्तर महाराष्ट्र
गुन्हे
वेब स्टोरी
क्रिकेट
राजकारण
व्हिडिओ
विदेश
व्हायरल
फोटो गॅलरी
‘मनी’ची बात
होम
शहरे
Mayor Reservation Lottery Live: राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण आज सुटणार
Mayor Reservation Lottery Live: राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण आज सुटणारMayor Reservation Lottery Live: नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल.
Written by:
प्रवीण विठ्ठल वाकचौरे
शहरे
Jan 22, 2026 09:18 am IST
Published On
Jan 22, 2026 07:05 am IST
Last Updated On
Jan 22, 2026 09:18 am IST
Mayor Reservation Lottery Live: राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण आज सुटणार
14 minutes ago
Maharashtra 29 Municipal Mayor reservation 2026 lottery: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज गुरुवारी मंत्रालयात ऐतिहासिक सोडत काढली जाणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात सुरू होणाऱ्या या प्रक्रियेमुळे राज्यातील 29 शहरांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात असून संपूर्ण प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार आहे.
महायुतीची महापालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित
मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारलेल्या भाजप-शिवसेना पक्षांमध्ये पालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित झाल्याचे कळते.
शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे.
तर महत्वाच्या समित्यांपैकी शिवसेनेकडून सुधार किंवा शिक्षण समितींची मागणी केली जात आहे
दरम्यान या वाटाघाटीत मुंबईत महापौर हा भाजपचा बसल्यास शिंदेंच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.
तर भाजपकडून सुधार समिती आणि आरोग्य समिती स्वत:कडे ठेवली जाणार असल्याचे कळते.
तर त्या बदल्यात शिवसेनेला शिक्षण, विधी, बाजार, उद्यान समिती दिली जाणार असल्याचे कळते.
Mayor Reservation: आरक्षणाची सोडत कशी निघणार?
प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या जातील.
अनुसूचित जाती (SC) व जमाती (ST) सर्वप्रथम या प्रवर्गांची सोडत निघेल.
ओबीसी (OBC): त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल.
खुला प्रवर्ग (Open): शेवटी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण स्पष्ट होईल.
महिला आरक्षण: प्रत्येक प्रवर्गात 50% जागा महिलांसाठी राखीव असतील, ज्याची स्वतंत्र सोडत काढली जाईल.
कोणत्या महापालिकांसाठी आरक्षण सोडत?
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड.
Mayor Reservation: आरक्षण सोडतीची प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील 29 महापालिकांच्या पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल. यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात असून संपूर्ण प्रक्रिया चक्राकार पद्धतीने पार पडणार आहे.











