April 20, 2026 12:28 pm

बारामतीचा कांदा पाहायला शेतकऱ्यांची मोठी गर्दी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारामतीतील ‘कृषिक’ या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या एका कांद्याची मोठी चर्चा सुरू आहे. हा कांदा साधासुधा नाही तर तब्बल एक किलोचा आहे. एक किलोचा एक कांदा असा विचारही आपण करू शकत नाही. एक किलोचे किमान १० लहान-मोठे कांदे भरतात. मात्र बारामतीच्या मातीत एक किलोच्या एका कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे.

 

कांदा लागवडीपासून काढणी, साठवणूक आणि थेट बाजारपेठेपर्यंतच्या व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी शेतकरी प्रत्यक्ष शेतात भेट देत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, या पद्धतीचा अवलंब केल्यास कांदा उत्पादनात गुणवत्ता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते.

बारामतीत उत्पादित उच्च प्रतीच्या कांद्याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष

उत्कृष्ट आकार, रंग व टिकाऊपणामुळे कांद्याला विशेष मागणी

आधुनिक शेती तंत्रज्ञान व शास्त्रीय पद्धतींचा प्रभावी वापर

कमी खर्चात अधिक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

लागवड, साठवणूक व विक्री व्यवस्थापनाबाबत शेतकरी घेत आहेत प्रत्यक्ष माहिती

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर कांद्याची लागवड

कृषी प्रदर्शनामध्ये एक किलोचा कांदा पाहायला मिळत असून नेदरलँडचा कांदा बारामतीच्या मातीत रुजला गेलाय. या कांद्याचा रंग काळा राहणार असून याची साठवण क्षमता सात ते आठ महिने असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर ही कांद्याची लागवड करण्यात आली असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा हा ह्याचा मुख्य उद्देश आहे.

काय आहे बारामती पॅटर्न?

सुधारित व प्रमाणित कांदा बियाण्यांची निवड

माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन

ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर

रोग व कीड नियंत्रणासाठी वेळेवर उपाययोजना

साठवणुकीसाठी योग्य व हवेशीर कांदा चाळी

आकर्षक लाल रंगाचा हा कांदा जवळपास 500 ते 800 ग्रॅम ते तब्बल एक किलो वजनापर्यंत याची वाढ होत असल्याने या कांद्याच्या एका किलोच्या बियामध्ये एका एकरात देखील लागवड होत असल्याने शेतकरी हा कांदा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

 

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!