April 20, 2026 12:23 pm

आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आंबेगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तात्काळ कारवाईत एका इसमाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करत त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा करडा प्रहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

गुप्त बातमीवरून कारवाई

दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनचे अमलदार ज्ञानेश्वर चिटे व प्रमोद भोसले यांना गुप्त बातमी मिळाली होती की, स्वामी नारायण मंदिराजवळ, सर्व्हिस रोड, आंबेगाव खुर्द (पुणे) येथे एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे.

ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला.

 

आरोपीची ओळख

तपासादरम्यान संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव

सूर्यकांत सोमनाथ धोडके (वय 28 वर्षे)

व्यवसाय : शेती

राहणार : सिडी हाइट्स, अभिमन्यू कॉलेजजवळ, नेऱ्हे, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले.

 

शस्त्रसाठा जप्त

झडती घेतली असता आरोपीकडून

१ गावठी बनावटीचे पिस्तूल

२ जिवंत काडतुसे

अंदाजे ₹42,000/- किमतीचे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपीविरोधात आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर : 26/2026 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 23 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कदमकर करीत आहेत.

इतर गुन्ह्यांचा तपास

तपासात आरोपीविरोधात वालचंद नगर पोलीस स्टेशन, ता. इंदापूर (पुणे ग्रामीण) येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक, अमलदार व तपास पथकातील अनेक अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

पोलीस सतर्क

शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!