April 23, 2026 9:17 pm

मुंबईतही आता भव्य ‘बिहार भवनाची बांधणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरु असताना या वादात भर पडावी अशी एक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर आता मुंबईतही एका भव्य ‘बिहार भवन’ बांधले जाणार असल्याचे कळतंय.

 

नितीश कुमार सरकारने यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 

बिहारमध्ये सध्या भाजप व नितीश कुमार यांच्या जेडीयूची सत्ता आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट येथे 0.68 एकर जमिनीवर हे भवन उभे राहणार आहे. या जागेच्या हस्तांतरणासाठी नितीश यांनी केंद्र सरकार व इतर परवानग्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता नितीश सरकारने आर्थिक तरतूद केली आहे.

 

दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर मुंबईत हे भवन बनवले जाणार आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी बिहारमधून येणाऱया लोकांची येथे व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सरकारी कामकाज व बैठकांसाठीही याचा वापर केला जाणार आहे.

 

असा असेल प्रकल्प

बिहार भवनची इमारत तळघरासह 30 मजली असेल.

इमारतीत एकूण 178 खोल्या.

72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल असेल.

बिहारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडचे शयनगृह असेल.

सेन्सरवर चालणाऱ्या स्मार्ट डबल व ट्रिपल पार्किंगची व्यवस्था असेल. त्यात 233 गाड्या पार्क करता येतील.

इन हाऊस कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष व अन्य सुविधाही असतील.

 

 

जागा ठरली, ३१४ कोटी २० लाख मंजूर

बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बिहार भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात उभारले जाणार आहे. सुमारे ३० मजली (तळमजल्यासह) इमारत असून, ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला ३१४ कोटी २० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार असल्याचे कुमार रवी यांनी सांगितले.

 

२४० बेडची डॉरमेटरी, १७८ रूम्स,कॅफेटेरिया…अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज

“या इमारतीत सरकारी कामकाज, बैठका आणि निवासासाठी सुविधा असतील. विशेषतः कर्करोग उपचारासाठी बिहारमधून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी खास व्यवस्था करण्यात येईल,” असे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुमारे ०.६८ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या बिहार भवनाची उंची सुमारे ६९ मीटर असेल. बहुमजली इमारतीत एकूण १७८ रूम असतील, तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी २४० बेडची क्षमता असलेली डॉरमेटरी असेल. याशिवाय, सेन्सर-आधारित स्मार्ट ट्रिपल किंवा डबल-डेकर पार्किंगची सुविधा असून, एकाच वेळी २३३ वाहनांचे पार्किंग करता येणार आहे. इमारतीत कॉन्फरन्स हॉल (७२ आसनक्षमता), कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि अन्य आवश्यक सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.

 

मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय हा राज्याच्या प्रगतीसाठी आणि लोककल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबईतील बिहारच्या रहिवाशांसाठी सुविधा सुधारण्याच्या दिशेने आणि बिहारच्या बाहेर राज्याची प्रशासकीय उपस्थिती मजबूत करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!