सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे मजेशीर, गोड आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे कारनामे, कधी पाळीव प्राण्यांचे गमतीशीर क्षण, तर कधी जंगलातील प्राण्यांची निरागस झलक पाहायला मिळते. पण, सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून लोक अक्षरशः पोट धरून हसत आहेत. कारण- या व्हिडीओचा हीरो आहे. एक चिमुकला हत्ती आणि त्याची अॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी एकच डिमांड केली आहे. “याला ऑस्कर द्या!”
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लहान मुलगा आणि हत्तीच्या पिल्लामधील खेळकर क्षण दाखवतो. व्हिडीओ पूर्णपणे निरागस, मजेशीर आणि हसवणारा आहे. कुठलाही हिंसक प्रकार नाही, फक्त खेळ आणि गमतीशीर अभिनय आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा खेळत असतो. त्याच्या हातात एक नकली बंदूक असते. त्याचा कोणालाही घाबरवण्याचा हेतू नसताना, तो मजेत, त्या बंदुकीने ‘धाड’ असा आवाज करतो. तेवढ्यात समोर उभा असलेलं हत्तीचं पिल्लू अचानक जमिनीवर पडतं.
जणू काही एखाद्या सिनेमातला सीनच चालू आहे. हत्तीचं पिल्लू इतक्या नाट्यमय पद्धतीनं खाली पडतं की, पाहणाऱ्यांना क्षणभर विश्वासच बसत नाही. त्याचं टायमिंग आणि शांत पडून राहणं सगळंच परफेक्ट दिसत. काही सेकंद तो तसाच पडून राहतो, जणू खरंच काहीतरी घडलं आहे.नंतर तो मुलगा त्याला जवळ येऊन मिठी मारतो, तेव्हा हत्तीचं पिल्लू हळूहळू उठतं आणि पुन्हा तितक्याच निरागसपणे उभं राहतं. हा सगळा प्रकार इतका गोड आणि मजेशीर आहे की, एकदा पाहून कोणालाही पुन्हा पुन्हा व्हिडीओ पाहावासा वाटतो.











