April 23, 2026 9:17 pm

भिवंडीत माजी महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ठाणे : भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास पाटील व प्रतिभा पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे भाजपा आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौगुले व त्यांचे समर्थक असल्याचा विलास पाटील यांच्याकडून करण्यात आला. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या संदर्भात ठिय्या मांडलेला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात राडा झाला आहे. आधी विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटाच्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं असून सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

 

भाजपा आमदाराचं कार्यालय फोडलं :

याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गटाच्या दोन्ही नेत्याकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीवरुन दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी भिवंडीत तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. या हल्ल्यात माजी महापौर विलास पाटील यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील जखमी झाल्या आहेत.

 

माजी महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक :

कोणार्क विकास आघाडीचे चारही उमेदवार प्रभाग एकमधून निवडून आले असून कोणार्कनं भाजपाच्या चारही उमेदवारांचा पराभव केला. त्यामध्ये भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले यांचाही पराभव करत कोणार्कनं या प्रभागात आपलं अस्तित्व पुन्हा सिद्ध केलं. या घटनेनंतर भाजपाचे पराभूत झालेले मित चौघुले यांच्यासह भाजपाच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक केली, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मित चौघुले यांच्या भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड केली.

 

निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी : भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसनं 30 तर राष्ट्रवादी (शप) नं 12 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील राहणार आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष स्वतंत्र लढले. मात्र निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणी समाजवादीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी काँग्रेसला साथ देत पूर्वमधून काँग्रेसचे जवळपास 24 उमेदवार निवडून आणले आहेत.

 

भिवंडी पूर्व मध्ये समाजवादीची ताकद :

भिवंडी पूर्वमध्ये समाजवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्यातील अंतर्गत वाद उफाळल्यानं शेख यांनी काँग्रेसला साथ दिली. आझमी आणि शेख यांच्यातील वादाचा फटका समाजवादीला बसला असून समाजवादीला अवघ्या 6 जागा जिंकता आल्या. त्यातही 6 जागा या भिवंडी पश्चिम मतदार संघातील असून पूर्वेत समाजवादीला एकही जागा जिंकता आली नाही. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 उमेदवारांना देखील आमदार शेख यांनीच छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.

 

महापालिकेवर सत्ता स्थापनेचा दावा :

महापालिकेवर सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला अवघ्या 34 जागा जिंकता आल्या. भाजपाच्या एकूण 22 उमेदवारांपैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिवसेनेला 12 जागांवर विजय मिळाला आहे. माजी महापौर जावेद दळवी यांच्या भिवंडी विकास आघाडीनं तीन जागांवर विजय मिळविला आहे. प्रभाग 22 मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शाम अग्रवाल यांचा अपक्ष उमेदवार नितेश एनकर यांनी 21 मतांनी पराभव केल्यानं इथं अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!