21 व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारतासह जगभरातील हजारो धावपटू या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदाच्या मुख्य स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंचंच वर्चस्व राहिलं. तर भारतीय गटातही धावपटूंनी आंतररष्ट्रीय स्पर्धकांना चांगली टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं.
मुख्य एलिट स्पर्धा विजेते (पुरुष गट) :
प्रथम क्रमांक – टाडू अबाटे डेमे (इथिओपिया) – 2:09:55 (50 हजार युएसडी)
द्वितीय क्रमांक – लिओनर्ड लिंगाट (केनिया) – 2:10:10 (25 हजार युएसडी)
तृतीय क्रमांक – मेहावे वेलडेमारया (इरिट्रिया) – 2:10:22 (15 हजार युएसडी)
मुख्य एलिट स्पर्धा विजेते (महिला गट) :
प्रथम क्रमांक – येशी चिकोले(इथिओपिया) – 2:25:13 (50 हजार युएसडी)
द्वितीय क्रमांक – लिसान गेब्रेेदिन(इथिओपिया) – 2:27:35(25 हजार युएसडी)
तृतीय क्रमांक – बोजोन एनये (इथिओपिया) – 2:28:27 (15 हजार युएसडी)
भारतीय पुरुष गट :
प्रथक क्रमांक – डॉ. कार्तिक कारकेरा – 2:19:55 (5 लाख रुपये)
द्वितीय क्रमांक – अनिश मगर – 2:20:08 (4 लाख रुपये)
तृतीय क्रमांक – प्रदीप चौधरी – 2:20:49 (3 लाख रुपये)
ड्रीमरनमध्ये मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग, सामाजिक संदेश आणि जनजागृती :
यंदच्या ड्रीमरनमध्ये 25 हजारांहून अधिक जणांनी आपला सहभाग नोंदवल होता. ज्यात विविध सेवाभाव संस्थांचा सहभाग होता. ‘वास्तव’ या पुरुषांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेनं राज्यात दरवर्षी 3 हजार पुरुष महिलांच्या जाचाला कंटाळून आत्महत्य करत असल्याचा दावा करत पुरुषांच्या संबंधित तक्रार निवारणासाठी राज्यात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करत यंदच्या मॅरेथॉनमध्ये जनजागृती केली. तर सीपीएए (Cancer Patient Aid Association) नं लढा देणारी झाशीची राणी आणि कॅन्सरचं प्रतिकत्मक रुप सादर करत संस्थेशी संबंधित कॅन्सर वॉरियर्सच्या सहाय्यानं या भयानक रोगाशी सकारात्मक मानसिकतेनं कसा लढा देता येईल याचा संदेश मॅरेथॉनच्या माध्यमातून लोकांना दिला. या ड्रीमरनमध्ये सहभागी होत मुंबईतील कदम कुटुंबानं एका अनोख्या पद्धतीनं ऑलिप्मिक खेळांचा प्रचार आणि प्रसार केला. या कुटुंबाची खासियत म्हणजे एक भाऊ आणि त्याच्या सह बहिणींनी मिळून स्वत:ला संपूर्णपणे बुद्धीबळ, तिरंदाजी, हॉकी, वेटलिफ्टिंग, रायफल शूटिंग, बॉक्सिंग आणि कुस्तीचा पेहराव केला होता.तर मुंबईतील वृक्षतोड रोखून पर्यावरण संवर्धनाचा संदेश एका अनोख्या पद्धतीनं दिला. या तरुणांनी तब्बल सहा तासांच्या मेहनतीनं आपलं संपूर्ण अंग पर्यावरणाशी साधर्म्य बॉडीपेंटिंगच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
खराब AQI आणि कोस्टल रोडवरील चढण आव्हानात्मक :
सध्या मुंबईचा आणि खासकरुन दक्षिण मुंबईचा ढासळलेला हवेचा दर्जा यंदाच्या मॅरेथॉनमध्ये धावपटूंकरता काहिसा त्रासदायकच राहिला. उपलब्ध आकडेवारीनुसार सकाळी 8 वाजता मुंबई शहराचा AQI 197 होता. (ज्याला आरोग्यासाठी धोकादायक श्रेणीत वर्गीकृत केलेलं आहे). सकाळी उजाडण्याच्यावेळी सुरुवातीच्या तासांमध्ये शहरातील बराचसा भाग धुक्याच्या चादरीत वेढलेला दिसत होता. ज्यात मॅरेथॉनशी संबंधित वांद्रे, मरिन ड्राईव्ह आणि कुलाबा परिसराचा समावेश होता. यावर्षी प्रथमच मॅरेथॉनचा मार्ग कोस्टल रोडवरुन नेण्यात आला ज्यात धावपटूंना अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य अनुभवता आलं, मात्र तेथील फ्लायओव्हर ब्रिज चढणं तितकसं सोप नव्हतं.
हजारो खेळाडूंचा सहभाग :
मॅरेथॉनमधील धावपटूंच्या सुरक्षेसाठी प्रमुख मार्गावरील रस्ते पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यंदाच्या फुल मॅरेथॉनमध्ये एकूण 14,059 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, जो मुंबई मॅरेथॉनच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक होता. मुंबईतील परिवहन सेवांनीही धावपटूंना मदत करण्यासाठी विशेष नियोजन केलं होत. पहाटेपासूनच मेट्रो आणि रेल्वेच्या सर्व मार्गांवर गाड्या अतिरिक्त फेऱ्यांचं आयोजन केल्यामुळे मॅरेथॉनच्या ठकाणी ठिकाणी पोहोचणं मुंबईकरांना अधिक सोयीचं झालं.











