April 23, 2026 10:32 pm

21 व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा जल्लोष सुरू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

21 व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा आज मुंबईत जल्लोष सुरू आहे. दक्षिण मुंबईत पार पडणारी मुंबई मॅरेथॉन ही केवळ एक रेस नसून, भारतातील सर्वात मोठं क्रीडा व्यासपीठ आहे. जिथं सर्वस्तरातील व्यक्ती नवीन सुरुवात स्वीकारण्यासह ‘हर दिल मुंबई’ या भावनेनं धावण्यासाठी एकत्र येतात. 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंची सरशी पाहायला मिळत आहे. तर 21 किमी अर्ध मॅरेथॉन या मुख्य स्पर्धांसह ज्येष्ठ नागरिकांची दौड, व्हिलचेअर रन आणि सर्वात मोठं आकर्षण असलेल्या ड्रीमरनला मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

 

यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ठ्य :

या स्पर्धेची खासियत म्हणजे यंदा प्रथमच ही स्पर्धा मुंबईच्या कोस्टल रोडवरून धावणार. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वळणावळणाचा आणि चढउतार असलेला बराचसा भाग धावपटूंसाठी वगळण्यात आलाय. त्यात मुंबईत पहाटेच्यावेळी पसरलेली गुलाबी थंडी धावपटूंसाठी काहीशी आल्हाददायक ठरत आहे. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये वेळेचा एखादा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. या मॅरेथॉनमध्ये 69,100 लोकं सहभागी झालेत. ज्यात 65,400 हून अधिक जण प्रत्यक्ष मुंबईत तर 3700 हून अधिकजण व्हर्च्युअली जगातील विविध शहरांतून यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. या फुल मॅरेथॉनध्ये 14059 जणांनी आपला विक्रमी सहभाग नोंदवलाय. या मॅरेथॉनसाठी लोकं वर्षभर धावण्याचा नियमित सराव करतात. 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन, 21 किमीची अर्ध मॅरेथॉन या मुख्य स्पर्धांसह ज्येष्ठ नागरिकांची दौड, व्हिलचेअररन आणि सर्वाधिक सहभाग तसेच सर्वात मोठं आकर्षण असलेल्या ड्रीमरनमधून मुंबईच्या विविधतेचे रंग आणि मुंबईकरांचं खर स्पीरीट पाहायला मिळते.

उत्साहवाढीचा सहभाग

69,000+ धावपटू (65,400+ मैदानावर आणि 3,700+ व्हर्च्युअल) यंदा धावण्यासाठी भाग घेत आहेत — हा ऐतिहासिक सहभागी रेकॉर्ड आहे.

नवीन मार्गाचा अनुभव

यंदा आधी कधीही न वापरलेले मुंबई कोस्टल रोड आणि बांद्रा-वर्ली सी लिंक यांचा समावेश मार्गात करण्यात आला असून, धावपटूंना समुद्राच्या किनाऱ्याची दृष्ये अनुभवायला मिळत आहेत.

जागतिक स्तराचे मानांकन —

हा एक World Athletics Gold Label रेस आहे, त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची महती वाढली आहे.

मुंबईत उत्सव आणि वातावरण

शहरभर उत्साह — मुंबईकरांनी सकाळपासूनच रस्त्यांवर धावपटूंचं स्वागत आणि उत्साह वाढवला आहे.

मुख्य रस्त्यांवर बंदी आणि मार्गबंदी — कोस्टल रोड, सी लिंकसह अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सेलिब्रिटी सहभाग — प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांचाही सहभाग धावांमध्ये नोंदवला गेला आणि त्यांनी मुंबईच्या “अमेजिंग” स्पिरिटचे कौतुक केले आहे.

 

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!