April 23, 2026 3:48 pm

खेलो इंडिया वुमन्स लीग किक बॉक्सिंग स्पर्धेत साताऱ्याच्या सना–सईचा सुवर्ण ठसा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

इंदोर (मध्य प्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया वेस्ट झोन किक बॉक्सिंग वुमन्स लीग स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील मुलींनी घवघवीत यश संपादन करत जिल्ह्याचा क्रीडा इतिहास उजळवला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या ८४ खेळाडूंमधून सातारा जिल्ह्यातील पाच मुलींची निवड झाली होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात व तेलंगणा या राज्यांतील ५०० हून अधिक मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संघाने एकूण ५१ पदकांची कमाई करत २० सुवर्ण, १७ रौप्य व १४ कांस्य पदके पटकावली.

यामध्ये सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी २ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक पटकावून विशेष ठसा उमटवला. किसनवीर कॉलेजची सना वजीर शेख हिने सुवर्णपदक पटकावले, तर कन्याशाळा वाईची सई विठ्ठल धायगुडे हिनेही सुवर्णपदकाची कमाई केली. फलटणची अंजली अमोल रोमन व गीतांजली जयराम बंडगर यांनी रौप्यपदक मिळवले, तर किसनवीर कॉलेजची कुमारी काजल निरज शर्मा हिने कांस्यपदक पटकावून सातारा जिल्ह्याच्या यशात मोलाची भर घातली.

या सर्व खेळाडूंची येत्या मार्च महिन्यात चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया वुमन्स लीग किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंचा सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ज्ञानदीपच्या प्राचार्या शुभांगी पवार मॅडम, सेम थॉमस, रुपेश सिंग सर, बाजार समिती संचालक तानाजी कचरे, युवा नेते व उद्योजक विजयसिंह पिसाळ, किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फुकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत महाराष्ट्र किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, सहसचिव विशाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

महाराष्ट्राचे प्रशिक्षक ओमकार राठोड सर व दिया गावडे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सातारा किक बॉक्सिंग संघटनेचे अंकुश जांभळे, तेजस यादव, सचिन लेंभे, सफिया शेख, रविराज गाढवे व वजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी कठोर सराव केला. या दैदीप्यमान यशाबद्दल सातारा शहरात विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!