April 23, 2026 5:00 pm

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचा अभिषेक पवार राज्य गुणवत्ता यादीत ६०वा आणि शाळेचा निकाल ९९ . ३७ % सुयश

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचा चि . अभिषेक दीपक पवार इयत्ता आठवी हा विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत 60वा आलेला आहे तसेच शाळेतील एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 99.37% लागलेला आहे आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९५.३८ टक्के लागलेला आहे या दोन्ही परीक्षेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेतील 291 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यामध्ये एलिमेंट्री परीक्षेला एकूण 161 विद्यार्थी बसले होते त्यापैकी ए श्रेणी प्राप्त विद्यार्थी 19 बी श्रेणी प्राप्त विद्यार्थी 45 आणि शेकडा निकाल 99.37% टक्के लागला आहे तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी 130 विद्यार्थी बसलेले होते त्यामध्ये ए श्रेणी प्राप्त विद्यार्थी 21 बी श्रेणी प्राप्त विद्यार्थी 32 शेकडा निकाल ९५.३८% टक्के लागलेला आहे.

ही शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक अशा या पाच राज्यातून एकाच वेळी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते या परीक्षेला विद्यार्थी संख्या सात ते आठ लाख परिक्षार्थी सहभागी असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य गुणवत्ता यादीतील शाळेने आपले स्थान कायम ठेवत इंटरमिजिएट ग्रेड परीक्षे मध्ये अभिषेक दीपक पवार इयत्ता आठवी हा विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत 60वा आलेला आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे कलाशिक्षक श्री घनःश्याम महादेव नवले व श्री संदीप गणपती माळी .यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री . अमित कुलकर्णी सर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री . अनंतजी जोशी सर शालेय समिती सदस्य श्री . सारंग कोल्हापुरे सर श्री . नितीन पोरे सर शालाप्रमुख श्री . पांडुरंग मोहिते सर पर्यवेक्षक श्री . श्रीनिवास कल्याणकर श्री . महेश जोशी सौ . अनिता कदम तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक व अभिनंदन केले

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!